नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटाच्या निकृष्ट कामकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते समाजसेवक शेतकरी व्यापारी यांच्यावतीने बुधवार दिनांक 24 जुलै रोजी वैभववाडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमित माळकर, दिलीप जामदार यांनी केले आहे.
करूळ घाटातील नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पहिल्याच पावसात संरक्षक भिंती सह रस्ता वाहाहून गेला आहे. तर अनेक संरक्षण भिंती खचल्या आहेत. याबाबत सर्वस्तरातून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते माळकर यांनी अधिवेशन कालावधीत मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे करूळ घाटाची चर्चा विधिमंडळापर्यंत पोहचली आहे.
करूळ घाटाच्या निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या ठेकेदारांना बदला. तसेच घाट मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधणे. या प्रमुख मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता दत्तमंदिर वैभववाडी येतुन मोर्चाला सुरुवात होईल. तिथून तो तहसील कार्यालयावर जाईल. या मोर्चात तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार, नागरिकांनी यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन अमित मालकर, दिलीप जामदार यांनी केले आहे.