बौद्धजन पंचायत समिती गट क्र.३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती व बौधाचार्य संघ नालासोपारा पू. यांच्या संयुक्त विद्यमाने

१०वी,१२ वी, पदवीधर विध्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारि यांचा सत्कार समारंभ व वर्षांवास कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती गट क्र.३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती व बौधाचार्य संघ नालासोपारा पू. यांच्या संयुक्त विद्यमाने १०वी,१२ वी, पदवीधर विध्यार्थी,सेवानिवृत्त कर्मचारि यांचा सत्कार समारंभ व वर्षांवास कार्यक्रम किशोर खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बौ.पं शाखा गट क्र. ३६ चे गट प्रतिनिधी अजितभाऊ खांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच नालासोपारा, मुंबई येथे संपन्न झाला.

यावेळी गटप्रतिनिधी अजितभाऊ खांबे यांनी काही महत्वाच्या बाबी लक्षात आणून दिल्या.आणि असे कार्यक्रम राबविण्यामागचा उद्देश काय आहे हे समजावून आणि पटवून सांगितले. तर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा .डॉ.महादेव इरकर सर यांनी उपस्थित विध्यार्थी व पालक वर्गाला आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध करून अप्रतिम अस मार्गदर्शन केलं.त्यांनी अनेक उदाहरणे देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकली आणि सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता समन्वय समितीचे कार्यकर्ते व बौद्धचार्य संघ नालासोपारा पू.यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.असं बौ.पं शाखा समन्वय समितीचे प्रमुख संघटक अशोक पां.कांबळे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आयु कमलाकर जाधव यांनी केले .यावेळी अनेक विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!