वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा काळसे गावाला तडाखा

ग्रामपंचायत इमारतीसह अनेक घरांवर झाडे पडुन, लाखोंची हानी; वीज वितरणचेही नुकसान

चौके (अमोल गोसावी) : सोमवार दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी आणि मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी आलेल्या चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका मालवण तालुक्यातील काळसे गावाला बसला आहे. यामध्ये सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता आलेल्या वादळात काळसे ग्रामपंचायत इमारती वर सागाचे झाड कोसळून छपराचे १ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले तर ग्रामपंचायती लगत घर असलेल्या श्री. जितेंद्र प्रताप बागवे यांच्या घरावर आंब्याचे भलेमोठे झाड कोसळून त्यांच्या घराच्या आणि शौचालयाच्या छप्पराचे सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या घरातील धान्य आणि इतर साहित्य भिजून नुकसान झाले आहे. याबरोबरच आज मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भंडारवाडी येथी श्रीमती ज्योती सुधाकर कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे छप्पर , शौचालयावरील दोन पाण्याच्या टाक्या फुटून व त्यावरील लोखंडी छप्पर कोसळून सुमारे ७२०००/- रुपयांचे नुकसान झाले आहे.

याव्यतिरिक्त सतत दोन दिवस वारंवार होत असलेल्या वादळी वाऱ्यात काळसे गावातील इतरही काही ग्रामस्थांच्या घरांवर , पडवीवर झाडे पडून तसेच वाऱ्यामुळे कौले व पत्रे उडून जात आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राजश्री राधाकृष्ण घाडी यांच्या पडवीवर झाड पडून संपूर्ण पडवीचे छप्पर कोसळून ९२०००/- रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच सुमन बापू प्रभु १३८००/- , लीनता यशवंत परब १२५००/- , अरुण मदन परब ८५००/- , दिपक गंगाराम परब ९२००/ , वैजयंती परशुराम बागवे ८७००/- , विश्वनाथ सुयश परब १५७००/- , वैशाली बाळकृष्ण परब १२३००/- , श्रीकृष्ण भदू परब ९८००/- , जयश्री दिगंबर परब १२९००/ , शैलजा विजय परब ८३००/-, प्रशांत विश्वनाथ हेरेकर ६९००/ उमेश विनायक प्रभु २५००/- , राजश्री कृष्णा धुरी ६६००/- असे एकूण सुमारे ५,५८,७००/- रुपयांचे नुकसान काळसे ग्रामपंचायती सह रहिवाशांचे झाले आहे. याबरोबरच काळसे रमाईनगर नजीक मुख्य रस्त्यावर सागाचे झाड पडून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारा आणि खांबांवर पडून वीज वितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कर्मचारी आबा परब , योगेश काळसेकर , आणि सागर गावठे हे गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
दरम्यान काळसे सरपंच विशाखा काळसेकर , सदस्य मोनिका म्हापणकर , तलाठी निलम सावंत , ग्रामसेवक पी. आर. निकम यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तलाठी निलम सावंत , कोतवाल प्रसाद चव्हाण यांनी आज सकाळपासून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना सादर केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!