जितेंद्र प्रताप बागवे आणि ज्योती सुधाकर कदम यांना दिली तातडीची आर्थिक मदत आणि ताडपत्री
चौके (अमोल गोसावी) : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काळसे गावातील नुकसानग्रस्त नागरीकांच्या मदतीला आमदार वैभव नाईक धावून आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत काळसे ग्रामपंचायती नजीक घरावर झाड पडून छप्पराचे जास्त नुकसान झालेल्या जितेंद्र प्रताप बागवे आणि काळसे भंडारवाडा येथील आंब्याचे झाड पडून घराचे छप्पर आणि पाण्याच्या टाक्या फुटून व त्यावरील लोखंडी छप्पर कोसळून नुकसान झालेल्या ज्योती सुधाकर कदम यांना तातडीची आर्थिक मदत आणि ताडपत्री आज दुपारी सुपूर्द केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज , युवा विभाग प्रमुख वंदेश ढोलम , उपविभागप्रमुख उमेश प्रभु , महिला उपविभागप्रमुख जागृती भोळे , शाखाप्रमुख राजू परब , पेंडूर जि.प. मतदारसंघ पक्ष निरीक्षक रूपेश आमडोसकर, बाबू टेंबुलकर , काळसे सरपंच विशाखा काळसेकर , सदस्य मोनिका म्हापणकर , तलाठी निलम सावंत , बाळा भोजणे , रमेश प्रभु , उमेश प्रभु, उपविभागप्रमुख , मोनिका म्हापणकर , प्रशांत प्रभु , दीपक प्रभु, सुनिल वरक , संतोष परब , दिपक बागवे , संदिप नार्वेकर , जगदीश भोळे , अजित प्रभु , मिलिंद कदम उपस्थित होते.