कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने कालच इशारा पातळी गाठली. सध्या नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु झाली. त्यामुळे नदी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
आज दुपारी 12 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 41 फुट होती. सध्या 60 हजार 700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फुट आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.