परिस्थितीशी लढता लढता निसर्ग कोपला

त्रिंबक येथील तारामती गावडे यांचे वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले

शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचे शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन

आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्याने पळसंब व त्रिंबक मध्ये मोठया प्रमाणात हाहाकार उडविला. यावेळी पळसंब त्रिंबक हद्दीवर असलेले त्रिंबक साटमवाडी येथील तारामती हरी गावडे यांच्या मातीच्या घराच छप्पर पूर्णतः उडून गेले. त्यांचा लाखमोलाचा असलेला निवाराच उडून गेल्याने कुटुंब पूर्ण पणे हादरले असून त्यांना आज खऱ्या आधाराची गरज आहे . कोकणात विषेशता सर्वच घरामध्ये पावसाळा चालू होण्या अगोदर दोन महिने मोठ्या कष्टाने मेहतीने वर्षभरासाठी लागणारे धान्य सामान, जळावू लाकडे, इत्यादीची तरतुद मोठया मेहनतीने प्रत्येक कुंटूब करत असते.

त्यात घराचे पूर्ण छप्परच उडून गेल्याने घरातील कपडे कागदपत्र पूर्ण पणे उधवस्त झाले असून घरातील लाईट व्यवस्था पूर्ण पणे बंद झाली असून सदर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अत्यंत हलाकीत गरीब परिस्थितीशी झगडत आपण मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत संसाराचा गाडा हाकणारी तारामती गावडे व कुटूंब पूर्ण पणे निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असून शासनाकडून काही मदत मिळतेय का या अपेक्षेत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच आचरा शिवसेना विभाग प्रमुख पळसंब मा.सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सदर घटनेची पाहणी करत तारामती गावडे हिला आधार देत सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यत पोचवण्याची जबाबदारी मी घेतो. व आपणास मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन गावडे कुंटूबाला दिले. त्यावेळी त्रिंबक माजी सरपंच राजू त्रिबंककर व महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!