आचरा शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या कडे दिले पत्र
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिबंक साटमवाडी येथील तारामती हरि गावडे यांच्या घराच्या नुकसान भरपाई साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेले पत्र मालवण दौऱ्यावरती असणारे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना नेते आमदार रविंद्र फाटक यांना आज आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी मालवण येथे दिले.
यावेळी मालवण शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, आचरा उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना तालुका प्रमुख मिहिर राणे आदी उपस्थित होते.