प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तपत्र
आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष म्हणून मालवण येथील संदीप रामचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी केली. मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, सावंतवाडी तालुका रिक्षा चालक सुहास सावंत आदी उपस्थित होते.