वैभववाडी तालुक्यात लाडकी बहिण योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करा – आ.नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिला आर्थिक स्वावलंबी बनवणारी आहे. ही योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचली पाहिजे. या योजनेत चांगले काम करून तालुक्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाख रुपये विकास निधी देण्यात येणार आहे तर द्वितीय  व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे 15 लाख व दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. वैभववाडी पंचायत समिती सभागृहामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर  प्रांतअधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील,  गटविकास अधिकारी जंगले, एकात्मिक बाल विकास अधिकारी वैशाली काकडे, मुख्याधिकारी सुरज कांबळे आधी उपस्थित होते.

आमदार राणे यांनी उपस्थितांना केवळ लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न विचारण्याची सूचना केली. यावेळी ही योजना राबविताना बऱ्याच गावात नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्याने अर्ज ऑनलाईन भरतेवेळी समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तर लोरे राणेवाडी येथील अंगणवाडीचा अतिरिक्त चार्ज दुसऱ्या महिलेला देण्यात यावा अशी मागणी रितेश सुतार यांनी केली.
यावेळी प्रांत अधिकारी श्री कातकर यांनी तालुक्यात अंगणवाडी सेविकांमार्फत एकूण 13,372 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये 7604 पात्र महिला लाभार्थी सापडले आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत 6195 ऑफलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. यातील 5478 लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन करण्यात आले आहेत. 717 ऑनलाईन करायचे शिल्लक आहेत. तर तालुक्यातील खाजगी केंद्रांवरून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांची यादी लवकरच प्राप्त होईल असे सांगितले. तर मुंबई व अन्य शहरात राहणाऱ्या येथील मूळ रहिवासी असलेल्या जवळपास 2000 महिला लाभार्थी होतील असे कातकर यांनी सांगितले त्यामुळे वैभववाडीतील एकूण लाभार्थींची संख्या जवळपास 9500 होईल असे सांगितले. 31 जुलै पूर्वी या योजनेचे अर्ज भरून घेण्याची सूचना कातकर यांनी केली तर या योजनेला मंजुरी विधानसभा क्षत्रिय समिती देणार असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार राणे यांनी 100% या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचा विकास निधी देण्याचे जाहीर केले आहे तर तालुक्यात दोन नंबर येणाऱ्या ग्रामपंचायतीला 15 लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी दहा लाख रुपये विकास निधी देण्यात येईल असे जाहीर केले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नासिर काझी  जिल्हा बँकेचे संचालक दिलीपराव राणे, भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंदराव राणे, नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांच्यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!