आ.नितेश राणे यांनी वैभववाडी बस स्थानकाला दिली भेट

प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल आ.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बस स्थानकातील पाणी,शौचालय, प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून  दया.अशी सक्त सूचना देत प्रवाशांच्या गैरसोयी बाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बसस्थानकला भेट देत पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांनी बसस्थानकातील अडचणींचा पाढा वाचला.
बस स्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. फोंडा व तळेरे या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक आहेत. वैभववाडीत देखील दोन अधिकारी हवेत असे नागरिकांनी सांगितले. बैठक व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय सुविधा नाही, असे नागरिकांनी सांगितले. बेसिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

या ठिकाणी तात्काळ बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काम मंजूर होऊन देखील बसस्थानक परिसर डांबरीकरण झाले नसल्याचे यावेळी नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित ठेकेदाराला सदर काम तात्काळ चालू करण्यात यावे अशा सूचना दिल्या. यावेळी या कामाचा शुभारंभ देखील आमदार नितेश राणे यांनी केला.

error: Content is protected !!