रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा घेतला आढावा
वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवापूर्वी वैभववाडी रेल्वे स्थानकातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्राथमिक सेवा सुविधा पूर्ण कराव्यात यामध्ये जर काही अडचण असेल तर ती आम्हाला सांगा जी कामे वरिष्ठ पातळीवरची असतील या संदर्भात या मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. या रेल्वे स्टेशनंला कोण वाली नाही असे समजू नका. अशा सक्त सूचना कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या आमदार नितेश राणे यांनी शनिवारी वैभववाडी रेल्वे स्टेशनला भेट देऊन या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा आढावा घेतला. यावेळी कोकण रेल्वेचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजू पडगर, विवेक अंबाडेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, स्टेशनमास्तर बेटकर, तसेच भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी, प्रमोद रावराणे अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे प्राची तावडे, शारदा कांबळे, नेहा माईनकर, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, देवानंद पालांडे, सुनील रावराणे, प्रकाश पाटील, सुधीर नकाशे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राणे यांनी प्रथम रेल्वे स्टेशनच्या समस्या जाणून घेतल्या. प्रमोद रावराणे व पदाधिऱ्यांनी रेल्वे स्टेशनच्या समस्याचा पाढाच आमदारांसमोर वाचला. वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच स्टेशन बाहेर असलेला सर्कल अडचणीचे ठरत आहे. ते तातडीने काढावे. तसेच रस्ता, फ्लॅटफॉर्मवर निवारा शेड, शौचालय, उड्डान फुल, स्ट्रीट लाईट या प्राथमिक सुविधा आगामी गणेशउत्सवपूर्वी पूर्ण करा. अशी सक्त सूचना आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तुमच्या पातळीवर होणारी कामे तातडीने हाती घ्या. जी कामे तुमच्याकडून होणार नाहीत. ती आम्हाला सांगा ती कामे आम्ही खा. नारायण राणेच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडून करून घेऊ. असे सांगितले.
तसेच वैभववाडी रेल्वे स्टेशन संदर्भात लवकर वरिष्ठ पातळीवर मिटिंग घेणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. वैभववाडी स्टेशन हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. जवळच नापणे धबधाबा हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे वैभववाडी रेल्वे स्टेशन कणकवलीच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या सुशोभीकारण करण्यात यावे. अशी मागणी प्रमोद रावराणे यांनी केली.
तसेच एक्सप्रेस गाडयांना वैभववाडीत थांबा मिळावा. स्टेशनवर आरक्षण खिडकी पुन्हा सुरु करावी. अशा विविध मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.












