आमदार नितेश राणे यांची लोरे नं.१ येथील आपत्तिग्रस्त लोकांना मदत

वैभववाडी (प्रतिनिधी) : 25 जुलै रोजी लोरे नं १ येथे झालेल्या वादळी वारा, अतिवृष्टी मुळे झाडांची पडझड होऊन घरांचे छप्परांचे नुकसान झाले होते. लोरे गावातील वैशाली मनोहर राणे, सुनील वासुदेव राणे, महेश श्रीधर राणे, हरिश्चंद्र मोसमकर, वैशाली गायकवाड, शशिकांत धुमक, रघुनाथ राणे, वनिता वासुदेव राणे, नागवेकर या आपत्तीग्रस्तांच्या घरांवरती झाडे पडून छप्परांचे नुकसान झाले होते ही बाब सरपंच अजय तुळशीदास रावराणे व माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांच्या मार्फत सर्व आपत्ती ग्रस्तांना छप्पर दुरुस्तीसाठी सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले. व तात्काळ नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती – सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, नरेश गुरव, सुनील रावराणे, प्रकाश रावराणे, अनंत रावराणे, सचिन सावंत, संजय खाडये, सदानंद गुरव, जीवन रावराणे, तुषार रावराणे, संतोष मोसमकर, चंदू तेली, अमित रावराणे व ग्रामस्थ उपस्थित होते नुकसानग्रस्त घरांची पाहणी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली.

error: Content is protected !!