चिंदर भटवाडी येथील निर्मला दळवी यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी येथील रहिवासी निर्मला दत्तात्रय दळवी यांचे 27 जुलै रोजी रहात्या घरी निधन झाले. त्या 71 वर्षाच्या होत्या. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीचे खजिनदार विश्वनाथ उर्फ पिंट्या दळवी यांची ती मातोश्री होत.

error: Content is protected !!