चिंदर केंद्रातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण
अरविंदबुवा पाताडे यांचा पुढाकार
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर नं 1, कुंभारवाडी, शाळा चिंदर बाजार, जि. प शाळा अपराजवाडी, शाळा पडेकाप, जि.प. शाळा सडेवाडी, शाळा भटवाडी, जि. प. शाळा पालकरवाडी, गावडेवाडी या शाळांना मुंबईस्थित सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून आज वही, पेन, पेन्सिल, खोड रबर असे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. गेली तीन वर्षे अरविंदबुवा पाताडे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्य वितरित होत असून आजचे शैक्षणिक साहित्य अरविंद बुवा पाताडे, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, बाळा पाटणकर, अण्णा मसूरकर, अनंत तोरसोळकर यांच्या हस्ते वितऱीत करण्यात आले.
यावेळी शिक्षक राजेंद्र गाड, प्रवीण तेली, गंगाराम पोटघन, राजेंद्र चौधरी, भीमाशंकर शेतसंदी, स्मिता जोशी, स्वाती पाटील, नेहा कुबल, नवनाथ भोळे, शुभांगी लोकरे-खोत, निशिगंधा वझे, रतन बुटे, अमोल खेडकर, उज्ज्वला पवार, नंदकुमार जुधळे, नीलिमा घाडी, दिपा गोसावी, सर्व शाळांन मधील विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते.