चौके ( अमोल गोसावी ) : अधिवक्ता परिषद सिंधुदुर्ग जिल्हा व अधिवक्ता परिषद मालवण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी समर्थ मंगल कार्यालय कोळंब, तालुका मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिवक्ता यांच्यासाठी नवीन लागू झालेल्या सुधारीत कायद्यातील महत्वपूर्ण बदलांचे विहंगावलोकन होणेकरिता अधिवक्ता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भारत माता व भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने अभ्यासवर्गाचा शुभारंभ झाला त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता सूर्यकांत प्रभूखानोलकर यांनी केले. अभ्यासू अधिवक्ता उमेशजी सावंत यांनी प्रथमतः जेष्ठ विधिज्ञ कै. बापुसाहेब परुळेकर-रत्नागिरी यांचे निधनास १ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची आठवण म्हणून व देवगड येथील अधिवक्ता रुपेश राणे यांच्या पूजनीय वडिलांना देवाज्ञा झाल्याने श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उमेश सावंत यांनी आपल्या ओजस्वी, ओघवत्या वाणीमध्ये व खुमासदार शैलीमध्ये विविध उदाहरणे देत भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यांविषयी व भारतीय न्यायव्यवस्थेतील बदलांविषयी विस्तृत विहंगावलोकन केले.
अधिवक्ता उमेशजी सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यान्याला सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद देत यापुढेही अशाच प्रकारचे त्यांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा उपस्थितांकडून करण्यात आली आणि त्यास उमेशजी सावंत यांनीही आपली तयारी दर्शवली. सलग तीन तास चाललेल्या या व्याख्यानामध्ये उपस्थितांनी दोन वेळा सलग व्याख्यान चालू ठेवा अशी विनंती केली. तसेच या कार्यक्रमासाठी मालवण तालुक्यातील जेष्ठ अधिवक्ते सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व मालवण तालुका बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष गिरीशजी गिरकर हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून विधीज्ञांनी मोठ्या संख्येने हजेरी दर्शवली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता दिलीप ठाकूर, अधिवक्ता सुदर्शन गिरसागर, अधिवक्ता अमित पालव, अधिवक्ता सोनल पालव, अधिवक्ताअविनाश पाटकर, अधिवक्ता हृदयनाथ चव्हाण, अधिवक्ता कन्हैया निवतकर, अधिवक्ता राहुल कांबळी, अधिवक्ता अक्षय पवार, अधिवक्ता सुरज चौगुले, अधिवक्ता एस. व्ही. प्रभूखानोलकर सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता पलाश चव्हाण यांनी केले. अधिवक्ता परिषदेचे मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप महादेव मिठबावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.