सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वर प्रॉब्लेम मुळे सार्वजनिक धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. अद्यापही सामान्य गरजू ७० ते ८० टक्के रेशन धारकांना अद्याप धान्याचा पुरवठा झालेला नाही. लाभार्थ्यांना अनेक वेळा धान्यासाठी फेरफटका मारावा लागत आहे. तरी तात्काळ ऑफलाईन धान्य पुरवठा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल. असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना अद्यापही शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे धान्य मिळालेले नाही. जिल्ह्यात सर्वर प्रॉब्लेम मुळे धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे सामान्य गरजू रेशन धारकांना अनेक वेळा धान्यासाठी फेरफटका मारावा लागत आहे. आता केवळ या महिन्याचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने धान्य पुरवठा होईल याची शाश्वती नाही .त्यामुळे जिल्ह्यातील सर्वर प्रॉब्लेम दूर होईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने धान्य पुरवठा करण्यात यावा. तसेच धान्य वितरणासाठी मुदत वाढवून मिळावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने ऑफ लाईन धान्य देण्यासंदर्भात रूट अधिकारी नेमून निर्णय घेण्यात येत असून उद्या पासून ऑफ लाईन धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच ज्यांना या महिन्यात धान्य मिळणार नाही त्यांना मुदतवाढ देण्यात येईल. व पुढील महिन्यात धान्य वितरण करण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, विजय प्रभू ,विधाता सावंत, संदेश कोयंडे ,प्रथमेश परब आदी उपस्थित होते.