खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवी या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०१७ व २०१९ मध्ये जाहिर केलेल्या शासनाच्या कर्जमुक्ति योजनेतील शेतकरी तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले .तर १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजने अंतर्गत लाभ मिळालेला नाही गेली दहा वर्षे विविध आंदोलने उपोषणे करूनही शासन शेतकऱ्यांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी किंवा उपोषणावेळी केवळ शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून आश्वासनेच मिळाली आहेत त्यांच्या मागणीचा विचार झालेला नाह त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज सोमवारी पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले तर याबाबत न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे .

सन २०१७ मध्ये जाहिर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३०७७ शेतकऱ्याना कर्जमाफी मिळालेली नाही. तसेच २०१९ मध्ये जाहिर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्त योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही अनेक शेतकरी या दोन्ही योजनेच्या कर्जमाफी पासून वंचित आहेत. याबाबत अनेकवेळा आंदोलने केली, उपोषण केले तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही . आता शेतकऱ्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे २ लाख वरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दया.अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर ,प्रकाश वारंग, सुधीर परब, सुभाष भगत, अमोल सावंत,उत्तम नाईक, श्यामसुंदर राय आदीं शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!