वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे कुंभारवाडी रस्त्यावरील श्रमदानाने झाडी तोडत असताना तेथीलच रहिवासी संशयित आरोपी प्रांजल जाधव पॉल, जोसेफ पॉल या दंपत्याने अंगावर कुत्रा सोडून दांड्याने मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार प्रिया भानुदास तावडे रा. वैभववाडी शहर यांनी दिली आहे. या संदर्भात वैभववाडी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया भानुदास तावडे यांची कोकीसरे येथे जमीन असून आहे कोकिसरे मुख्य रस्ता ते कुंभारवाडी पर्यंत ग्रामस्थांच्या श्रमदानातून रस्त्यावरील झाडे झुडपे तोडून रस्ता वाहतुकी योग्य करीत होते. संशयित आरोपी प्रांजली जाधव पॉल हिने यादरम्यान पाळीव कुत्रा अंगावर सोडून, दांड्याने हातावर मारून प्राची तावडे यांना गंभीर दुखापत केली. तर जोसेफ पॉल याने आपल्यासह ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकी दिली आहे. सोमवारी सकाळी 10:30 च्या दरम्यान घडली आहे. अशी तक्रार यांनी दिली आहे यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला त्यांच्यातावडीतून सोडविले असे सौ तावडे हिने वैभववाडी पोलिसांना सांगितले आहे. वैभववाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (2),115 (2),352, 3 (5 )नुसार गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा तपास प्रीती शिंगारे करीत आहेत.