मसूरे (प्रतिनिधी) : श्री देवी सातेरी जल मंदीर बिळवस आषाढी वार्षिक जत्रोत्सवामध्ये श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास कुडाळ माड्याचीवाडीचे श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट केंद्राच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारीने काम केले. जत्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना सहज, सुलभ, योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचे केंद्र प्रमुख तानाजी पाटील, माजी केंद्र प्रमुख सीता गावडे, तुकाराम माळकर, संतोष निगुन, दर्शना बांदल, सुनिता माळकर यांचे श्री सातेरी देवालय बिळवस ट्रस्ट आणि ग्रामस्थांकडुन आभार मानण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भाई सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.