वैभववाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर महामार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. बालिंगा पुलावरीलही पाणी ओसरले आहे. महामार्ग प्राधिकरनाकडून पुलाची पाहणी करून मंगळवारपर्यंत वाहतूकीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना महापुराला असून गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर खोकूर्ले, मांडूकली, किरवे तसेच बालिंगा पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक गेली आठ नऊ दिवस पूर्णपणे टप्पे झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरी मार्गे वळवण्या आली आहे.
गेले दोन दिवस राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी रस्त्यावर आलेले पाणीही खाली गेले आहे. कोल्हापुर येथील पंचगंगा नदीवरील बालिंगा पुलावर आलेले पाणीही ओसरले आहे. मात्र पुलावरून पुराचे पाणी गेल्यामुळे या महापुराने पुलाला कोणत्या प्रकारची हानी झाली आहे का याची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी केल्यानंतर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच वाहतूक सुरु होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पुलावरून वाहतूक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मंगळवारी वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.