कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील हर्षिका हेमंतकुमार तांबे यांनी मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या एल.एल.बी.(वकीली)परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना हा अभ्यासक्रमांक पूर्ण करण्यासाठी प्रेरणा गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, पती हेमंतकुमार तांबे, दोन्ही मुली इशा, अभिज्ञा यांच्याकडून मिळाली. तर मार्गदर्शन, सहकार्य वकील ऍड. अशपाक शेख यांच्याकडून मिळाले. ओरोस ते दोडामार्ग असा रोज प्रवास करून तीन वर्षे एल.एल.बी.चा अभ्यास करत आणि परिवार संभाळत हे यश पहिल्या प्रयत्नात संपादन केले. या साठी त्यांनी अपार कष्ट घेतले. सौ.हर्षिका तांबे या दोडामार्ग गटसाधन केन्द्रात विशेष तज्ज्ञ या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












