वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन चिन्मय चे केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘वूशु’ या क्रीडा प्रकारात १७ वर्षे वयोगटातून ६० ते ६५ वजनी गटातून अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी कु. चिन्मय दशरथ शिंगारे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्राचार्य बी.एस.नादकर, क्रिडा शिक्षक एस.टी.तुळसणकर, एन.व्ही प्रभू, व्ही.एस मरळकर, एम.एस.चोरगे व आदी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

