वडाचापाट ग्रामविकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वडाचापाट ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि मंडळाचे अध्यक्ष देवानंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पूर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही प्रमाणात मदतीचा हात देता यावा यासाठी मंडळाचे अध्यक्ष देवानंद पालव आणि कार्यकारी मंडळाने पुढाकार घेतला. मंडळाचे अध्यक्ष पालव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक दिलीप पालव, माजी सरपंच सतीश पालव, शाळेचे माजी विद्यार्थी गौरव पालव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तावडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मालंडकर मॅडम, शिक्षिका सेजल परब, शिक्षिका सानिका पालव आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका मालंडकर मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक दिलीप पालव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका मालंडकर मॅडम यांनी वडाचापाट ग्राम विकास मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. तसेच मंडळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे माजी विद्यार्थी गौरव पालव यांचे मालंडकर मॅडम यांनी विशेष कौतुक केले. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष देवानंद पालव, सेक्रेटरी मनोज पालव, उपाध्यक्ष निलेश मांजरेकर, विनोद बिरमोळे, धर्माजी पालव, राकेश पालव, प्रभाकर पालव, महेश तावडे, प्रसाद तावडे आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!