कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली च्या वतीने 4 ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्ञातीबांधवांचा स्नेहमेळावा कणकवली कॉलेज च्या एच पी सी एल हॉलमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळाव्याचे उदघाटन शिरवल गावचे सुपुत्र तथा मुंबई येथील उद्योगपती संजय चव्हाण यांच्या हस्ते होणार असून भुईबावडा गावचे सुपुत्र, उद्योजक सुनील नारकर हे मुख्य अतिथी असणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन करून कोकणात शासकीय अधिकारी घडविण्याची चळवळ चालविणारे भारत सरकारच्या सीमा शुल्क विभागातील कनिष्ठ अनुवादक अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद जाधव, मयुरी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण यांनी केले आहे.