कणकवली (प्रतिनिधी) : “शिंदे साहेब… उरण ची यशश्री शिंदे, ही तुमची आडनाव भगिनी असली तरी, ती आता आखिल भारतीयाची ही बहीण आहे. तिच्या निर्घृण हत्येतील आरोपी , हा रक्षाबंधन च्या आत जिवंत किंवा मूडदा पकडला गेला नाही तर, ज्या हातात हे शिवसैनिक राखी बांधून घेतात, त्या हातात कायदा ही घेऊ शकतात. असा इशारा सिंधुदुर्ग चे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. संदीप सरवणकर यांनी दिला आहे. महिन्याभरातच, बेलापूर ची अक्षदा म्हात्रे आणि उरण- पनवेल ची यशश्री शिंदे यांची पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्त्या करण्यात आली आहे . रायगड – नवी मुंबई मधील महीलाचा सुरक्षेचा प्रश्न हा आता ऐरणीवर आला आहे. सीतेचे अपहरण केले होते म्हणून आजही रावणाचे चौकात दहन करून, आपला क्रोध अग्नी शमन होत नाही.तसा जनतेचा क्रोध , ह्या क्रूर हत्येत आरोपींना नुसती फाशी होऊन सुद्धा शमणार नाही. म्हणून ,अशा गुन्हातील आरोपींना पकडल्या नंतर खरतर चौकात फाशीच झाली पाहिजे आहे. अक्षता भगिनीचे आरोपी हे अटक झाले आहेत.त्यामधील आरोपिता विरुद्ध कसून पुरावे सरकार पक्षातर्फे कोर्टात दिले पाहिजे, म्हणजे, त्यांना मरे पर्यंत फाशी झालीच पाहिजे. आणि यशश्री ताईचे क्रूर नराधमाला तर जिवंत किंवा त्यांनी हल्ला केल्यास प्रती हल्ला करून तो त्यात जिवंत जरी नाही राहीला तरी चालेल.परंतु, तो परदेशात पळून जाण्यापूर्वी,त्याचे वर कारवाई ही झाली पाहिजे.नाही तर जनतेचा क्रोध अग्नी काय भस्मसात करील हे आताच सांगता येणार नाही.आणि नंतर आवरता येणार नाही. कारण, प्रत्येक भावाला आपली राखी बांधताना, या दोन्ही अभागिनी भगिनीची आठवण येईल , आणि त्याला पारंपरिक संस्कारांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव होईल, त्या आधी मा.मुख्यमंत्री श्री .शिंदे आणि मा.गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या जबाबदारी ची जाणिव ठेवून, तपासा दरम्यान कडक कारवाई करावी. अशा , इशारा संदीप सरवणकर यांनी माध्यमातून सरकारला दिला.