खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने भाजप पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप माजी जि.प. बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी भाजप खारेपाटण विभाग शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, खारेपाटण सोसायटी व्हाइस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर,संचालक विजय देसाई, खारेपाटण ग्रा.पं. सदस्य किरण कर्ले, मनाली होनाळे, धनश्री ढेकणे, शितिजा धुमाळे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, बूथ अध्यक्ष शेखर शिंदे,शेखर कांबळी,खारेपाटण केंद्र शाळेच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संध्या पोरे,सदस्य गाठे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेला सुमारे ४०० वह्या भाजप पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता देण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या शैशनीक साहित्याचा योग्य उपयोग करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सरपंच प्राची ईसवलकर यांनी विद्यार्थ्यांना केले.तर माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार यांनी शाळेचे व येथील उपक्रमांचे कौतुक करून खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श शाळा असून याचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असे आवाहन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उच्चश्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले. तर सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी मानले.