महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही – संजय राऊत

ब्यूरो न्यूज (मुंबई) : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले. काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, याबाबत राऊतांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही सगळी भाजपची कारस्थानं आहेत.

error: Content is protected !!