राज्याचे ऐतिहासिक मत्स्यविकास धोरण ठरवताना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील मच्छिमारांची मते जाणुन घेणार-विष्णू उर्फ बाबा मोंडकर
आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण तयार करण्यासाठी राज्य सरकारने भाजपा चे जेष्ठ नेते व उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली, या मत्स्यधोरणा संदर्भात मच्छिमारांचे अभिप्राय घेण्यासाठी वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर आलेले विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांचा वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मच्छिमार नेते वसंत तांडेल म्हणाले की, मत्स्यधोरणा संदर्भात अभिप्राय घेण्यासाठी सागरी तालुक्यात बाबा मोंडकर यांनी बैठका आयोजित करुन सर्वसामान्य मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. मच्छीमार बांधवांना सतत भेडसावणाऱ्या अनेकविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उदात्त हेतूने आणि मागील साठ वर्षाचा अनुभव घेता आत्ताच्या शासनाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने मत्स्योद्योग धोरण समिती स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन न थांबता तातडीने मत्स्योद्योग धोरण समितीची राज्यपातळीवर स्थापना सुद्धा केली या समितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांना वेळोवेळी वाचा फोडणारे अभ्यासू नेतृत्व श्री. विष्णू तथा बाबा मोंडकर यांची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती केली आहे, त्यामुळे मच्छीमारांच्या ज्वलंत समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णू उर्फ पपु परब, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व मनोहर तांडेल, मारुती दोडशानट्टी, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.