आमदार नितेश राणे यांच्या वाभवे वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उ.बा.ठा चे शहरप्रमुख शिवाजी राणे, सुधाकर आत्माराम शिर्के, सुहास राणे, धनंजय राणे, हर्षल मोरे, सुनील मोरे, समाधान रावराणे यांनी आमदार नितेश राणे, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, नासीर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंदराव राणे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, जयंत रावराणे, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












