सुदैवाने जीवितहानी ठळली
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर बाजार येथील सुषमा सुरेंद्र बांदिवडेकर यांच्या रहात्या घराची भिंत गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास पडली. सदर घरात पाच व्यक्ती वास्तव्यास आहेत, मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामसेवक मंगेश साळसकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, समीर हडकर, आचरा पोलीस सुदेश तांबे आणि मनोज पुजारे दाखल होत पहाणी केली. तदनंतर तलाठी संतोष जाधव यांनी पाहणी करून सुमारे 20,000 ची नुकसान झाल्याचे पंचयादीत म्हटले आहे.