कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावचे अमोल सत्यवान रावराणे व स्वप्नील गजानन गुरव या युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार नितेश राणे व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अरविंद रावराणे व गावातील पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद रावराणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असे यावेळी अमोल रावराणे यांनी सांगितले.