स्वातंत्र्यदिनी नवीन कुर्ली ग्रामस्थांचे कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली पुनर्वसित गावातील प्रलंबित प्रमुख पाच समस्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा नवीन कुर्की प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतीने अध्यक्ष रवींद्र नवाळे, कार्याध्यक्ष हरेश पाटील, सचिव आनंद सावंत व अन्य ग्रामस्थांनी 5. दिला आहे. याबाबतचे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन संघटनेतर्फे ना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन कुर्ली पुनर्वसित गावठाणाची सन क १९९५-९६ मध्ये स्थापना करण्यात आती मात्र, २९ वर्षे होत आली, तरी या गावातील समस्यांचे निराकरण झालेले नाही. गावामध्ये नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात पामध्ये गटार दुरुस्ती, अंतर्गत नेपोहोच रस्त्याचे बांधकाम, समाज मंदिरं दुरुस्ती, शाळा दुरुस्ती पाणीपुरवठासाठी नवीन पंप, पंप, पथदीप, नवीन नळयोजना आदी नागरी सुविधा पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावाची अधिसूचना ११ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात आली १ सप्टेंबर २०२३ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. गावात १४ खोल्यांच्या पूर्ण प्राथमिक शाळेशिवाय दुसरी प्रशासकीय इमारत नाही तरी या इमारतीमधील वापरात नसलेल्या एका खोलीत प्रशासकीय कामकाज सुरू करून कार्यालयाची व्यवस्था करण्याची मागणी करून वर्ष होत आले तरी कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय कामासाठी कणकवली पंचायत समिती येथे आर्थिक भुर्दंड सोसून हेलपाटे मारावे लागत आहेत. नवीन पुनर्वसितः गाव स्थापन करताना लोरे नं. १ येथील ८० टक्के जी फंडाघाट येथील २० टक्के भूभाग संपादन करून गाव स्थापन करण्यात आला मात्र फोंडाघाट तसेच लोरे नं.१ या गावांची सीमा जैसे थे ठेवण्यात आली. त्यामुळे एकाच निवासी भूखंडासाठी लोरे नं १ आणि फोंडाघाट या दोन तलाठी सजामध्ये महसुली कामासाठी जावे लागते सदर महसुल दप्तरी तत्काळ दुरुस्ती करून दिलासा द्यावा. नवीन कुर्ती स्वतंत्र महसुली गाव घोषित झाल्यापासून आजतागायत गावासाली स्वतंत्र पोलीस पाटील पद मिळाले नाही. गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने वीज समस्यावेळी इतर गावातील वायरमन येईपर्यंत प्रकल्पग्रस्त नागरिकांचा विद्युत पुरवठा बंद राहतो. स्वतंत्र वायरमन नियुक्त करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सुमारे ३४ ग्रामस्थांच्या सह्या असून या मागण्यांचा विचार न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.