मसुरे (प्रतिनिधी) : गोठणे येथील सुर्वे बंधू यांच्या वतीने खुडी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खुडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला खुडी सरपंच दिपक कदम, गणेश सुर्वे,माजी उप सभापती परूळेकर,शशिकांत परब, राजू जगताप, सुरेश साटम, संजय साटम, विजय परब, संतोष अडुळकर, आदेश परब,तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका -सौ.विनिता दुखंडे ,खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायली गोरे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कामतेकर,शा.व्य.स.उपाध्यक्षा आरेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच स्मिता कदम , ओगले , योगेश पाटील, विजय माने, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग,उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय जोईल व मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले .सुर्वे बंधू यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल व दातृत्वाच्या भावनेबद्दल खुडी गावचे सरपंच दिपक कदम तसेच माजी सरपंच संजय जोईल यांनी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खुडी शाळा व खुडी हायस्कूल तसेच संपुर्ण गावाच्या वतीने आभार मानले.
