यशामध्ये नेहमी सातत्य ठेवा ! देवदत्त पुजारे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन

श्री भगवती देवस्थान मुणगे कडून गुणवंतांचा गौरव

मसूरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील श्री भगवती देवस्थानची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडली आहे. इतर विध्यार्थ्यानी सुद्धा प्रेरणा घेऊन आपण सुद्धा पारितोषिक स्वीकारू असा आत्मविश्वास बाळगावा. यशामध्ये नेहमी सातत्य ठेवा असे प्रतिपादन श्री भगवती एज्यू. सोसायटी व्यवस्थापक आबा पुजारे यांनी येथे केले. श्री भगवती देवस्थान मुणगे यांच्या वतीने गावातील पहिली ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विध्यार्थी, क्रीडा स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम श्री भगवती देवालय येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर श्री भगवती देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये,उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, उपसरपंच दशरथ मुणगेकर, पो. पाटील साक्षी सावंत, शिक्षक प्रसाद बागवे, श्री दाभोलकर, विश्वस्थ दादा सावंत, पुरुषोतम तेली, अनिल धुवाळी,आनंद घाडी, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, माजी सचिव प्रणय महाजन, रामतीर्थ कारेकर, श्री भगवती एज्यू. सोसायटी व्यवस्थापक देवदत पुजारे, सौ. निकिता कांदळगावकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यशामध्ये सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा हे एक व्यसन आहे. यश मिळेलच याची शास्वती नसते. मनात दृढ निश्चिय करा. स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी शालेय जीवनातच निर्णय घ्या. स्पर्धा परीक्षा करताना जीवनात नेहमी प्लॅन बी तयार ठेवा असे प्रतिपादन श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले.

उपसरपंच दशरथ मुणगेकर म्हणाले, आपल्या पाल्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. मुलांवर कमीत कमी बंधने घाला. आई भगवतीचा आशिर्वाद बक्षीसाच्या रूपाने तुम्हाला मिळाला आहे. व्यसनापासून नेहमी दूर रहा. प्रणय महाजन, श्री दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले. उमेश पाडावे, माजी सरपंच सुरेश बोरकर, रविंद्र दवणे, विकी खैरनार, राजू पुजारे, नंदकुमार सोनटक्के, पांडुरंग नाडगौडा, रघुनाथ मेस्त्री, विश्राम मुणगेकर, संभू घाडी, बाळकृष्ण बागवे, प्राजक्ता महाजन, अनुजा कारेकर, मनाली परब, धाकोजी सावंत आनंद कदम, अशोक रूपे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सचिव निषाद परुळेकर यांनी तर सूत्रसंचलन व आभार देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी मानले.

error: Content is protected !!