खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या शाळेचा विद्यार्थी अर्फात हाफिज चौगुले याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
अर्फात चौगुले याने या कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याची सिंधुदुर्ग जिल्हा संघामध्ये निवड झाली असून पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.सदर विद्यार्थाला शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल विलास चौगुले सर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.या विद्यार्थ्यांचे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्था अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी अभिनंदन केले आहे. तर या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अर्फात चौगुले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.