खारेपाटण हायस्कूलमध्ये शालेय स्वराज्य सभा निवडणूक पार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये शालेय स्वराज्य सभा शैशणिक वर्ष सन – २०२४ – २५ निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने मतदान करून शाळेत सोमवार दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी सुरळीत पार पडली.यावेळी प्रत्येक वर्गातील एकूण सात प्रतिनिधींनी सात विद्यार्थी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर विद्यार्थी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सदर मतदानास मतदान अधिकारी म्हणून प्रशालेचे सहाय्यक शिक्षक मोटे सर, जाधव सर,हरयाण सर व शिंदे सर यांनी कामकाज पाहिले.अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत खालील विद्यार्थी उमेदवार विजयी झाले.

शालेय प्रतिनिधी- श्रुती ब्रह्मा जामसंडेकर,वाचनालय प्रतिनिधी सई प्रवीण लोकरे, सांस्कृतिक प्रतिनिधी – संस्कृती संजय भोर, स्वच्छता प्रतिनिधी – आदिती मंगेश पांगरे,क्रीडा प्रतिनिधी – सुजल संदीप पवार,अर्थ प्रतिनिधी अथर्व ऋषिकेश जाधव मुलांचा प्रतिनिधी- पवन पुनम चांदिलकर हे उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष- भाऊ राणे,सचिव महेशजी कोळसुळकर,सहसचिव राजेंद्र उरणकर व संस्थेचे सर्वपदाधिकारी ,खारेपाटण प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप सर, पर्यवेक्षक राऊत सर, सर्व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!