भा. म. संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग च्या वतीने मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार, घरेलू कामगार आणि सर्व असंघटित कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चा सकाळी 10 वाजता श्री रवळनाथ मंदिर ओरोस फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघेल, तरी सर्व कामगारांनी सकाळी 9 वाजता श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!