फोंडाघाट महाविद्यालयाची एकांकिका “जापसाल” लक्षवेधी !

मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या एकांकिका स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयाची पदार्पणातच आश्वासक वाटचाल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित ५७ व्या युवा महोत्सवातील मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक ३०,व ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयात पार पडली.या स्पर्धेतील अंतिम फेरीत मुंबई, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी, सिंधुदर्ग, जिल्ह्यातील २२ महाविद्यालयांची निवड झाली होती.या अंतिम फेरीत प्रथमच सहभाग घेतलेल्या फोंडाघाट महाविद्यालयांने विठ्ठल सावंत लिखित, आणि शेखर गवस दिग्दर्शित ” जापसाल ” ही एकांकिका सादर केली होती.यामधून अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट तीन,व उत्तेजनार्थ पाच एकांकिकांची निवड करण्यात आली.या एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या फोंडाघाट महाविद्यालयातील नवख्या कलाकारांनी इथपर्यंत मजल मारली. या एकांकिकेतील कलाकार प्राजक्ता लाड हिला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. बक्षीस विजेत्या एकांकिका मधील सर्व कलाकार मार्गदर्शक आणि तंत्रज्ञ तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक यांचे सर्व पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!