कृतार्थ झाले जीवन, कळ्यांची फुले करताना— लीना झुजे फर्नांडिस यांचे सत्काराला उत्तर !

शिक्षकांनी आपल्या सेवेचे भान राखत मुलांमधून विद्यार्थी आणि त्यातून सुजाण नागरिक निर्मिती करावी. 

मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लीना झुजे फर्नांडिस होय.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सुमारे ३५ वर्षाच्या अविरत, कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ,शिस्त पालन करत, कधी मुलांमधून मूल होऊन, आणि विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या कुटुंब- परिवार यांच्या भावविश्वाशी समरस होऊन,हातचे काहीही न राखता, माझा विद्यार्थी सर्वोत्तम घडला पाहिजे.या निश्चयाने दिलेल्या सेवेची पोचपावती म्हणजे शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक वर्गाने केलेला हा सत्कार होय. शिक्षकी पेशात मुलांचा अध्यापक, पालकांचा मार्गदर्शक आणि कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणून वावरताना सर्वांची यथोचीत साथ लाभली, त्यामुळे या दिवशी मी पूर्ण समाधानी आहे. असे भावोद्गार सत्कारमूर्ती लीना झुजे फर्नांडिस यांनी काढले.

सरस्वतीच्या प्रतिमेस वंदन करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले.तर प्रास्ताविक आणि मानपत्रवाचन दिलीप शेळके यांनी केले.यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण, डांबरे केंद्रप्रमुख शिवाजी पवार, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक मोहन पारकर, सुंदर पारकर, वांगणकरबाई, संजय सावंत, रेणुका जोशी,ललिता ठाकूर, रंजन नेरूळकर, सुनील पवार, संतोष टक्के, होळकर, विद्याधर तांबे, लक्ष्मण वळवी, इत्यादी मान्यवरांनी त्यांची शिक्षणाप्रती आवड, विद्यार्थी प्रियता, अभ्यासपूर्ण वर्तणूक, स्वभाव याबद्दल गौरव करून शुभेच्छा दिल्या. कुमार नाडकर्णी यांनी शिक्षणाच्या बदललेल्या व्याख्या, अन् काम करताना करावी लागणारी कसरत याचं विश्लेषण करत, मॅडम यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाला मॅडम यांच्या सेवा काळातील पालकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ, परिवारातील सदस्य आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन झूजे फर्नांडिस यांनी केले….

error: Content is protected !!