जलजीवन योजनेअंतर्गत चालु कामे बंद करण्याचा ठेकेदार संघटनेच्या बैठकीत निर्णय

लोकवर्गणीसाठी कॉन्ट्रॅक्टर ची बिले प्रलंबित ठेवली जातात या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचा ठेकेदार संघटनेचा ईशारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन योजनेअंतर्गत बहुतांशी कामे पूर्ण केलेली असून मार्च महिन्यापासूनच्या देयकांना पैसे मिळालेले नाहीत. येथील ठेकेदार हे स्थानिक असून त्यांची परिस्थिती आथिर्क बेताची आहे. शासनाला वारंवार विनंती करुनही ठेकेदारांना अद्याप बिले मिळालेली नाहीत. त्याचप्रमाणे लोकवर्गणीसाठी ठेकेदारांची बिले अंतिम केली जात नाहीत. अंदाजपत्रकातील त्रुटींबाबत योग्य निर्णय अद्याप घेतला गेला नाही या विषयावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील जनजीवनची कामे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व ठेकेदारांच्यावतीने आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलजीवन योजनेची कामे पूर्ण करण्यास विलंब झाल्यास ठेकेदार जबाबदार राहणार नाहीत त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे तसेच लोकवर्गणीसाठी कॉन्ट्रॅक्टर ची बिले प्रलंबित ठेवली जातात या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचा ईशारा देखील ठेकेदार संघटनेने दिला आहे.

यावेळी दिलीप सावंत, बाबा आंगणे, प्रसाद मोरजकर, उदयकुमार पाटील, गुरुप्रसाद तवटे, सागर माळवदे, प्रसाद कुलकर्णी, सुशांत घाडीगावकर, विलास गवस, गुरूनाथ पालकर आणि बहुसंख्य जल मिशनचे ठेकेदार उपस्थित होते.

error: Content is protected !!