चिंदर कुंभारवाडी पोलीस पाटील पदी स्वप्ना चिंदरकर यांची नियुक्ती !

माजी सरपंच संतोष कोदे यांच्या कडून कुंभारवाडी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर मधील महसूल गाव कुंभारवाडी गावासाठी सौ. स्वप्ना स्वप्नील चिंदरकर यांची पोलीस पाटील पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयातून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या सहिचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. ही निवड अराखीव-महिला प्रवार्गातून 27 ऑगस्ट 2024 ते 31ऑगस्ट अशी पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. त्याच्या निवडी बद्दल माजी सरपंच संतोष कोदे यांच्या कडून त्यांचे अभिनंदन करत कुंभारवाडी महसूल गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्ती बाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे .

error: Content is protected !!