लांजा तालुक्यातील असोडे गांगरकर वाडी ग्रामस्थांचा निर्धार
लांजा (प्रतिनिधी) : सिंधूरत्न समृद्धी योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा तालुक्यातील असोडे गांगरकर वाडी येथे श्रीराम मंदिरात ग्रामस्थांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजू धावणे युवा तालुका अधिकारी, तालुका सचिव वसंत घडशी, अजय चव्हाण, अल्ताफ काझी, उप तालुका प्रमुख संतोष रेवाळे, दिलीप गांगरकर गावकर, राजेश भातवडेकर, जयराम गांगरकर, शिवराम पानकर, अजय चव्हाण, संतोष अडबल, हेमंत मोघे, गुरुप्रसाद पवार, संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील विविध विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गावाचा संपूर्ण पाठिंबा असून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार केला.