फोंडाघाटचे पंचायतन,आराध्य दर्शन -एक पूर्वंपार चालत आलेली परंपरा !

फोंडाघाट लाडगावकर मानाच्या गौराई-गणपती- आराध्य पंचायतन दर्शन,जागरण अन विसर्जनास अलोट गर्दी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट कुळाचे मंदिर नजीक, लाडगावकरांच्या मानाच्या गणपती- गौराई दर्शनास फोंडाघाट पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद लाभला. या निमित्ताने सजविलेल्या गौराई अन श्रीमाऊलीच्या मूळ मुखवट्याचे तसेच पंचायतनाचे दर्शन भाविकांनी घेतले. गौराईच्या जागरणादिवशी माऊलीच्या मुखवट्यावरील तेज प्रत्येक भाविकास, माहेरवाशीणीस अथवा सासुरवासिनी कृपादृष्टीचा आत्मानंद देत होते. गौरी जागरणा दिवशी तर विविध सुस्वरआरत्या, झिम्मा, नाच, फुगड्यांचा पारंपारिक खेळ वारकरी, अबाल वृद्ध महिला पुरुषांमध्ये ओसंडत होता. यामध्ये विश्रांतीला एखादे भजनकरी गवळण सादर करून ऊर्जा निर्माण करीत होते. हा उत्साह आणि माऊली पंचायतनाचे तेज अधिकच तेजाळत होते. हा उत्सव अनुभवण्यासाठी दशक्रोशीतून भाविकानी सुद्धा गर्दी केली होती. लाडगावकर यांचे नियोजनही सुयोग्य होते. प्रचंड जल्लोषात गौरी- गणपतीचे विसर्जन फटाक्याच्या आतषबाजीत , ढोल ताशांच्या गजरात, आणि सह्याद्रीच्या साक्षीने, उगवाई नदीमध्ये केले गेले. यावेळी उपस्थित सर्व भावीक, आबालवृद्ध महिलांचे डोळे पाणावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!