बापर्डे कवठाळ वाडीतील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : संदीप तुकाराम घाडी उर्फ नाना याच्या नेतृत्वाखाली आत्माराम ज्येष्ठराम वेंद्रुक,गणेश तुकाराम वेंद्रुक,धोंडू कृष्णा वेंद्रुक,हरी धोंडू वेंद्रुक,रामचंद्र भिकाजी अनमने,लक्ष्मण विठ्ठल नरसाळे,व मिलिंद देवळेकर यांनी भाजपा चा झेंडा हातात घेतला आहे, आमदार नितेश राणे यांच्या विकासाच्या संकल्पनेवर वर प्रेरित होऊन प्रवेश घेतला आहे. आमदार नितेश राणे या भागाचा विकास करू शकतात असा विश्वासही प्रवेश करताना व्यक्त केला. यावेळी बाळा खडपे,बंड्या नारकर,उत्तम बिर्जे,रवी पाळेकर,अजित राणे,संदीप नाईक धुरे व बापर्ड सरपंच संजय लाड उपस्थित होते.

error: Content is protected !!