कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातुलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पुष्पगुच्छ व देवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके आदी उपस्थित होते.