स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे उपरकरांकडून घाणेरडे राजकारण
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाहक आरोप केल्यास सहन करणार नाही
भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल
कणकवली (प्रतिनिधी) : ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि ज्याला कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारत नाही असे परशुराम उपरकर जेव्हा मंत्री रवींद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांच्यावर बेछूट आरोप करतात त्यावर सिंधुदुर्गातील जनता नक्कीच विचार करेल अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल केला. स्वतःचे हिशोब चुकते करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी उपरकर हे शिवछत्रपती पुतळा दुर्घटनेचा वापर करत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग च्या विकासासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करता येत नसेल तर किमान घाणेरडे राजकारण करू नये. हे आरोप भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. जिल्हा विकासात 1 टक्का योगदान नसलेल्या उपरकर यांनी यापुढे मंत्री रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांच्यावर नाहक टीका केल्यास पुढील पत्रकार परिषदेत उपरकर यांची अंडी पील्ली बाहेर काढू असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला. राजकारणात स्वतःची किंमत शून्य झालेल्या उपरकर यांना मनसेने पक्षातून हाकलून दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनीही उपरकर याना पक्षप्रवेश दिला नाही. उपरकर याना किती किंमत द्यावी हे आम्हालाही कळते. त्यामुळे झिरो व्हॅल्यू झालेल्या उपरकर यांनी यापुढे भाजपा नेत्यांवर टीका करू नये असा सूचक इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.