चिंदर तेरई पोलीस पाटील पदी सोनाली माळगांवकर, पालकरवाडी पोलीस पाटील पदी प्रतिक्षा पालकर !

भगवंतगड पोलीस पाटील पदी सचिन आचरेकर तर भटवाडी पोलिस पाटील पदी मंगेश नाटेकर यांची नियुक्ती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर मधील महसूल गाव तेरई पोलीस पाटील पदी सोनाली विश्राम माळगांवकर यांची अराखीव प्रवार्गातून, पालकरवाडी महसूल गावमधून, प्रतिक्षा चंद्रशेखर पालकर यांची अराखीव महिला प्रवार्गातून नियुक्ती झाली आहे. भगवंतगड महसूल गावातून सचिन बाळकृष्ण आचरेकर यांची अराखीव प्रवार्गातून तर भटवाडी महसूल गावामधून मंगेश गोविंद नाटेकर यांची खुल्या प्रवार्गातून निवड झाली असून मालवण तहसीलदार कार्यालयातून नवनियुक्त पोलीस पाटलांना कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या सहिचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. चिंदर मध्ये नऊ महसूल गाव असून आठ महसूल गावात नवीन पोलिस पाटील नियुक्ती झाले आहेत. यापूर्वी गेली अनेक वर्षे महसूल गाव चिंदर बाजारचे पोलीस पाटील दिनेश दिगंबर पाताडे हे संपूर्ण चिंदर गावाचा पोलीस पाटील म्हणून कारभार पहात होते. नवनियुक्त पोलीस पाटील यांची निवड 27 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 29 अशी पाच वर्षाची असून त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!