आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये अपघात

बसच्या दर्शनी भागाचे नुकसान ; धामापूर येथील दुर्घटना

चौके (प्रतिनिधी) : मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान वास्को- मालवण हि कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून कुडाळच्या दिशेने जाणारा टेंपो MH- 07 X – 1936 यांच्या मध्ये धडक बसून अपघात झाला. यामध्ये कदंबा बसची समोरील काच फुटली आणि दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दोन्ही वाहनांचे चालक व बसमधील प्रवासी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान वास्को ते मालवण प्रवासी वाहतूक करणारी कदंबा बस आणि मालवण येथे सिमेंट वाहतूक करून माघारी परतत असणारा टेंपो यांच्या मध्ये येथील वळणाचा अंदाज वाहनचालकांना न आल्याने हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काळसे पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!