किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंडगे गावातील रस्ता कामांची उद्घाटने, भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

कोंडगे गावभेट दौरा आणि बैठकीला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद

लांजा (प्रतिनिधी) : सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा तालुक्यातील कोंडगे गावातील गुरव वाडी येथे डोंगरी विकास योजनेतून रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गुरव वाडी ते मारुती विश्वासराव डोंगरी विकास योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी राजू कुरूप – राजापूर लांजा विधान सभा क्षेत्र प्रमुख, गुरूप्रसाद देसाई – तालुका प्रमुख, उमेश पत्की – उप तालुका प्रमुख, बाबू गुरव – विभाग प्रमुख, महेश विश्वासराव – उप विभाग प्रमुख, अल्तमश वाघू, दिनेश पवार-विभाग प्रमुख वेरवली, डॉ.एस. व्हि. कदम – सरपंच ग्राम पंचायत कोंडगे तथा विभाग संघटक, पुंडलिक बेर्डे – उप सरपंच, मारुती विश्वासराव – शाखा प्रमुख- कोंडगे, संकेत गुरव, पंढरी गुरव, अमर चव्हाण, सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण गुरव, माजी सरपंच – जगन्नाथ बारस्कर, मनोहर पातेरे, नावेरी शिक्षण सस्थेचे सरचिटणीस – नरेश चव्हाण, चद्रकांत काटकर, जे,पी,जाधव, महेंद्र जाधव, श्रीधर विश्वासराव, विठ्ठलदास विश्वासराव, चद्रकांत बारस्कर, गजानन चव्हाण, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोंडगे गावाची बूथ स्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी गावाच्या वतीने किरण भैय्या सामंत यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!