गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांची माहिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभागातील अनेक गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे दि. १३ मार्च, २०२३ रोजी पुकारलेले “झोपकाडू आंदोलन” सध्या जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने तूर्तास रद्द करण्यात येत असल्याची माहिती आंदोलनकर्ते रमाकांत राऊत यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यातील शिमगोस्त्वाच्या पार्श्भूमीवर दिनांक ६/३/२०२३ ते २०/३/२०२३ या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी कायदा सुव्यवस्था सरुळीत राहण्याच्या दृष्टीने मनाई आदेश प्रसिधपत्रकदावरे जाहीर केल्यामुळे सदर दि.१३ मार्च २०२३ रोजी होणारे “झोपकाडू आंदोलन” आपण स्थगित करीत असून, पुढील आंदोलनाची दिशा व त्याची तारीख आपण लवकरच जाहीर करू, असे देखील आदोलानकर्ते श्री रमाकांत राऊत यांनी संगितले.
खारेपाटणसह आजूबाजूच्या अन्य गावात पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे एकाच गावच्या पोलीस पाटील कडे अनेक गावचा चार्ज दिला असल्यामुळे नागरिकांना त्रास शन करावा लागत आहे. तर खारेपाटण सारख्या मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात सुधा पोलीस पाटील हे पद सलग ६ वर्षे रिक्त असल्याने पोलीस पाटील यांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत. या मागणी करीता आपण झोपकाडू आंदोलनाचा इशारा प्रशासणाला दिला असल्याचे देखील रमाकांत राऊत यांनी दिली.












